बालमजुरी मुक्तीसाठी जिल्हा कार्यकारणी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालमजुरी मुक्तीसाठी जिल्हा कार्यकारणी बैठक
बालमजुरी मुक्तीसाठी जिल्हा कार्यकारणी बैठक

बालमजुरी मुक्तीसाठी जिल्हा कार्यकारणी बैठक

sakal_logo
By

बालकल्याण समितीच्या
जिल्हा कार्यकारणीची बैठक

कोल्हापूर, ता. ८ ः जिल्ह्यातील बालमजुरी मुक्तीसाठी हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारणी स्थापन करण्यात आली. यामध्ये बालकल्याण समितीच्या माजी सदस्या ॲड. दिलशाद मुजावर यांची अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. संगोपन मासिकाचे संपादक अतुल देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. तर बालमजूर मुक्त प्रकल्पाचे समन्वयक शिवकिरण पेटकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली. अमर कांबळे यांची कार्याध्यक्षपदी, उमेद संस्थेचे संस्थापक प्रकाश गाताडे यांची प्रसिद्धी प्रमुख तसेच सदस्यपदी सुधाकर भदर्गे, सागर गुरव, दिपाली सटाले, सात्ताप्पा मोहिते, अनुजा खुरंदळ, अभिजीत बोरगे, अमर पाटील यांची निवड झाली. या कार्यकारणीची नुकतीच बैठक झाली असून, जिल्ह्यातील बालमजुरीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीच्या विविध योजनांविषयी चर्चा झाली.