आजरा ः पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त

आजरा ः पोलीस वृत्त

sakal_logo
By

वृद्धेचा मृतदेह नदीत सापडला

आजराः कमळाबाई मारुती ढोकरे (वय ७१, पेरणोली) यांचा मृतदेह देवर्डेनजीक हिरण्यकेशी नदीत आढळून आला. महिनाभरापूर्वी त्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. याबाबतची फिर्याद आजरा पोलिसांत नोंदवण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी साडेसहाला त्यांचा मृतदेह हिरण्यकेशी नदीपात्रात मिळून आला. पाय घसरून किंवा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद आजरा पोलिसांत झाली आहे.