जंगली पक्ष्यांच्या अधिवासावर संक्रांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंगली पक्ष्यांच्या अधिवासावर संक्रांत
जंगली पक्ष्यांच्या अधिवासावर संक्रांत

जंगली पक्ष्यांच्या अधिवासावर संक्रांत

sakal_logo
By

60927/ 60928
------------
जंगली पक्ष्यांच्या अधिवासावर संक्रांत

मानवी हस्तक्षेप कारणीभूत; नैसर्गिक विविध घटकांचाही प्रभाव

अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : तबक उद्यान ते राजदिंडी मार्गावर अनेक कारणांमुळे झालेल्या पडझडीमुळे जंगली पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. अशाच पद्धतीने असा अधिवास घटत गेला तर जंगली पक्ष्यांची संख्या येणाऱ्या काळात कमी होऊ लागेल. परिणामी, निसर्गातील अन्नसाखळीतील पक्ष्यांतील काही घटक नामशेष होऊ लागतील.
पाच नोव्हेंबर हा डॉ. मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवसापासून ते १२ नोव्हेंबरला बर्डमॅन ऑफ इंडिया सलीम अली यांचा वाढदिवस. यानिमित्त महाराष्ट्रभर ‘पक्षी सप्ताह’ सर्व निसर्गप्रेमी साजरा करतात. याकरीता ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’तर्फे तबक उद्यान ते राजदिंडी मार्गावर अशी नोंद केली गेली. ‘बर्डस ऑफ कोल्हापूर’ने पक्षी निरीक्षणाच्या हिवाळी मोहीमेची सुरवात केली. पक्षी निरीक्षणाची सुरवात तबक उद्यान पन्हाळा येथे झाली. यात आठ स्थलांतरित, दोन स्थानिक स्थलांतरित तर २७ रहिवासी पक्ष्यांच्या एकूण ३७ प्रजातींची नोंद केली. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बुटेड वॉब्लर, ब्लिथस् रीड वॉब्लर, ग्रीन वॉब्लर, व्हरडीटर फ्लायकॅचर, ब्लू कॅप रॉकथ्रश, कॉमन रोजफींच, फॉरेस्ट वॅगटेल, ऍशी ड्रोंगो तर स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांत इंडियन पॅराडाइज फ्लायकॅचर, व्हाईट रंप शामा प्रजातींची नोंद झाली.
पक्षीमित्र प्रणव देसाई म्हणाले, ‘पक्षी निरिक्षणासाठी आम्ही दुर्बिण, कॅमेरा, ई-बर्ड, मर्लिन अशी डिजीटल ॲपचा वापर केला. यातील मर्लिन ॲपमुळे पक्ष्यांची ओळख करुन घेता येते; तर ई-बर्डमुळे पक्ष्यांची नोंद करता येते. येथे दोन गोष्टी लक्षात घेतली पाहिजे, त्या म्हणजे जंगलांतील पक्ष्यांचा झाडांवर अधिवास असतो. हे पक्षी किडे, किटक, गांडूळ, गोगलगाय, छोटी फळांवर गुजराण करतात. या पक्ष्यांचा विणीचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी असतो. हिवाळ्यात जे पक्षी स्थलांतरीत होऊन येतात. त्या पक्ष्यांना मात्र पाणथळ जागा लागते. स्थलांतरीत पक्ष्यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारी ते जूनपर्यंत असतो. हे पक्षी शैवाळ, कवचधारी प्राणी, सेंद्रीय घटक आदींवर गुजराण करतात. पाच नोव्हेंबरला पक्षी सप्ताह झाला, तेव्हा आम्हाला निसर्गातील मानवी हस्तक्षेप जाणवला.’’
...

मानवी अन्‌ नैसर्गिक हस्तक्षेप
-जंगलतोड वेगाने
-अतिपावसामुळे दरडी कोसळणे
-दरडीच्या खाली असणाऱ्या झाडांवर दरड कोसळणे
-दरडीलगत असणारी झाडे पडणे
-खालील जंगल, शेती दरडीमुळे गाडणे
-जुनी झाडे वेगाने नष्ट होण्याची प्रक्रिया
-परिणामी वन्यजीव, पक्षी, किटकांचा अधिवास धोक्यात
-रस्ते, घाटांची बांधणी
-रस्त्यांचे रुंदीकरण
-अनेक ठिकाणी प्लास्टिकचा कचऱ्यात वाढ
-जमिन भूसभूसीत होण्यास अनेक घटक कारणीभूत
-हवामान बदलांचाही परिणाम
-पन्हाळ्यावर उताराचा भाग
...

जागतिक तापमान वाढ, वातावरण बदल, निसर्गातील उलथापालथ, आधुनिक विकासासाठी चालू असलेल्या मानवी हस्तक्षेपाचे परिणाम येथेही दिसून आले. हे असेल सुरु राहीले तर मात्र जंगलांतील पक्ष्यांवर परिणाम होऊ शकतो. यासाठी निसर्गातील हस्तक्षेप पहिल्यांदा थांबवणे गरजेचे आहे.
-प्रणव देसाई, पक्षीमित्र
ंंंंं