राजाराम महाविद्यालयात आज रंगणार पुलकित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम महाविद्यालयात आज रंगणार पुलकित
राजाराम महाविद्यालयात आज रंगणार पुलकित

राजाराम महाविद्यालयात आज रंगणार पुलकित

sakal_logo
By

राजाराम महाविद्यालयात
आज रंगणार ‘पुलकित’

पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त दृक्‌श्राव्य मैफल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः मराठी साहित्यातील अष्टपैलू साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त उद्या (ता. ९) राजाराम महाविद्यालयात ‘पुलकित’ हा दृक्‌श्राव्य कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी पाचला मैफल सजणार असून, ‘सकाळ माध्यम समूह-यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) माध्यम प्रायोजक आहे. कार्यक्रमाला सर्वांना विनामूल्य प्रवेश असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक समितीने केले.
‘पु.लं.’नी संगीतबद्ध केलेल्या ‘इंद्रायणी काठी..’, ‘हसले मनी चांदणे...’ आदी तेरा गाण्यांसह विविध नाट्यप्रवेश, भाषणांच्या ऑडिओ रेकॉर्डची सुरेख गुंफण करत आजी-माजी विद्यार्थी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. विशेष म्हणजे ‘लाईव्ह’ वाद्यवृंदाची साथसंगत मैफलीला लाभणार आहे. एकूणच, पु. लं. देशपांडे यांच्या चौफेर साहित्याचे स्मरण करताना एक बहारदार सादरीकरणाचा प्रयत्न ही टीम करणार आहे.