आरोग्यातील पावती तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यातील पावती तपासणी
आरोग्यातील पावती तपासणी

आरोग्यातील पावती तपासणी

sakal_logo
By

आरोग्य निरीक्षकांकडील
पावतीपुस्तकांची चौकशी

कोल्हापूर, ता. ८ ः महापालिकेच्या काही आरोग्य निरीक्षकांनी दंडाच्या केलेल्या पावत्यांची रक्कम भरली नसल्याबाबत आरोग्य विभागाने त्यांच्याकडून दोन वर्षातील पावती पुस्तके मागवली आहेत. सर्वांनी पुस्तके जमा केली असून, त्यातील फाडलेल्या पावत्यांची चौकशी केली जात असल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांनी सांगितले.
निरीक्षकांकडून प्लास्टिक वापर, जैववैद्यकीय कचरा, रस्त्यावर थुंकणे, कचरा उघड्यावर टाकणे आदी दंड केला जातो. त्यात पाच हजार रूपये इतका प्लास्टिक वापरासाठी आहे. वंचित बहूजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे यांनी माहितीच्या अधिकारात दोन पावत्यांची माहिती मागितली होती. त्या पावत्यांचे पैसे महापालिकेत जमा झालेले नव्हते, अशी महापालिकेने माहिती दिली. त्यानंतर उपायुक्तांच्या सुचनेनुसार आरोग्य विभागाने सर्व आरोग्य निरीक्षकांकडून दोन वर्षातील पावतीपुस्तके मागवली. आरोग्य निरीक्षकांना पावती पुस्तक देण्यास मुख्य आरोग्य निरीक्षकांची परवानगी लागते. पण, त्यानंतर संबंधित निरीक्षकाने दंड केल्यानंतर त्याचे पैसे त्यादिवशी वा दुसऱ्या दिवशी महापालिकेत भरणे गरजेचे असते. बनसोडे यांनी दिलेल्या पावतींचे पैसे भरलेले नव्हत. इतरांनी पैसे भरले आहेत की नाहीत हे सर्वांची पावतीपुस्तके आल्यानंतर त्यातील किती पावत्या फाडल्या, त्याचे पैसे केव्हा जमा केले की नाही हे समजणार आहे. काहींनी पैसे भरले नव्हते. माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यानंतर गेल्या आठवड्यात काहींनी पैसे भरल्याची माहिती आहे. पण, चौकशीत किती वेळाने पैसे भरले हे समजणार आहे.