आवश्यक बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक बातम्या
आवश्यक बातम्या

आवश्यक बातम्या

sakal_logo
By

61235

ओम पाटील, यशस्विनी जाधव यांची
राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः धुळे येथे झालेल्या ४९ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर व कॅडेट ज्यूदो स्पर्धेत कोल्हापूर हायस्कूल येथील आदिराज फाउंडेशन व कोल्हापूर ज्यूदो क्लबच्या खेळाडूंनी यश मिळविले. कोल्हापूर ज्यूदो क्लबचे एकूण नऊ खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले. त्यात सब ज्युनिअर गटात मुलींमध्ये २८ किलोखालील वजन गटात यशस्विनी जाधव व सबज्युनिअर गटात मुलांमध्ये ५० किलोखालील वजन गटात ओम पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले. त्यांची चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
सबज्युनिअर मुलींमध्ये ३२ किलोखालील वजन गटात दिव्या कोळी व सबज्युनिअर मुलांमध्ये ४० किलोखालील वजन गटात अथर्व थडके यांनी कांस्यपदक पटकावले. सबज्युनिअर मुली ३६ किलोखालील वजन गटात जान्हवी पाटील, ४० किलोखालील वजन गटात भूमिका कराळे, सबज्युनिअर मुलांमध्ये ६६ किलोखालील वजन गटात यथार्थ वडाम आणि कॅडेट मुलींमध्ये ५२ किलोखालील वजन गटात शिवांजली देसाई व कॅडेट मुलांमध्ये ६० किलोखालील वजन गटात सुमीत कांबळे यांनी सहभाग नोंदविला. त्यांना कॉमनवेल्थ पदक विजेते संतोष बाबर, कोल्हापूर ज्यूदो क्लबचे प्रशिक्षक देवेंद्र डांगोळे, नूपुर चव्हाण व स्वरूप माने यांचे प्रशिक्षण मिळाले. जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे अण्णासाहेब पाटोळे व कोल्हापूर हायस्कूलचे प्राचार्य विवेकानंद हिरेमठ यांचे मार्गदर्शन लाभले.
..............
61234
‘प्रायव्हेट’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
कोल्हापूर ः प्रायव्हेट हायस्कूलच्या १९८४ बॅचचा स्नेहमेळावा झाला. जगभरातून ६० माजी विद्यार्थी उपस्थित राहिले. ए. व्ही. कट्टी, यू. एस. कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला. श्रीकांत पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तब्बल ३८ वर्षांनंतर सारे मित्र-मैत्रिणी एकवटले. कौस्तुभ कुलकर्णी, अनिता चित्रुक, शशांक साटविलकर, किरण शिंदे, विजय तांबे, ज्योती जेरे, गीता शाह यांनी संयोजन केले.