गडहिंग्लजकरांनी अनुभवले चंद्रग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजकरांनी अनुभवले चंद्रग्रहण
गडहिंग्लजकरांनी अनुभवले चंद्रग्रहण

गडहिंग्लजकरांनी अनुभवले चंद्रग्रहण

sakal_logo
By

61236
---------------------------
गडहिंग्लजकरांनी अनुभवले चंद्रग्रहण
गडहिंग्लज, ता. ९ : ढगाळ वातावरण आणि आकाशात धुरकट स्थिती असतानाही गडहिंग्लजकरांनी खंडग्रास आणि छायाकल्प चंद्रग्रहण पाहण्याची संधी साधली.
मराठी विज्ञान परिषदेच्या येथील शाखेतर्फे गडहिंग्लज सायन्स सेंटरच्या टेरेसवर नियोजन केले होते. उपस्थित विज्ञानप्रेमींना चंद्रग्रहण, त्याचा कालावधी, चंद्रग्रहणाबाबत असणारे समज-गैरसमज याबाबतची माहिती दिली. सायंकाळी सहानंतर खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात झाली. चंद्र क्षितिजावर येत असतानाच ग्रहण सुरू झाल्याने चंद्र तांबूस रंगाचा दिसत होता. तांबूस रंगाच्या चंद्राचा काही भाग काळपट मळकट भासत होता. खंडग्रास चंद्रग्रहण सहा वाजून २२ मिनिटानी संपले. सायंकाळी साडेसातपर्यंत छायाकल्प ग्रहण पाहता आले. खगोलप्रेमी व विद्यार्थ्यांनी दुर्बिणीतून व द्विनेत्रीतून चंद्रग्रहणाचे निरीक्षण केले. के. बी. पाटील, पल्लवी पाटील, डॉ. वरुण धूप, विश्वनाथ धूप, समर्थ शिंदे, भरत शिंदे, संजय घाटगे, बाळासाहेब बंदी, बी. डी. पाटील आदी उपस्थित होते.