मुगळीत धार्मिक कार्यक्रम उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुगळीत धार्मिक कार्यक्रम उत्साहात
मुगळीत धार्मिक कार्यक्रम उत्साहात

मुगळीत धार्मिक कार्यक्रम उत्साहात

sakal_logo
By

61252
-----------------------------------------------------------------
मुगळीत धार्मिक
कार्यक्रम उत्साहात
नूल, ता. ९ : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील पंत महाराज बाळेकुंद्री मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त दीपोत्सव, सत्यनारायण पूजा, प्रवचन व महाप्रसादाचा धार्मिक कार्यक्रम झाला.
दत्त संस्थान बाळेकुंद्रीचे ट्रस्टी डॉ. संजयदादा पंत बाळेकुंद्री यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. सौ. पुष्पावती दरेकर यांचे प्रवचन झाले. त्या म्हणाल्या, ‘‘पंत महाराजांनी अवधूताचा झेंडा खांद्यावर घेतला. आपले कर्म चांगले करूयात. प्रेम सुंदर आहे. शांती थोर आहे. प्रपंच करून परमार्थ साधा.’’ यावेळी पंत महाराजांची उदाहरणे देऊन गुरुबंधू व ग्रामस्थांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.
‘गोडसाखर’च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सौ. मंगल आरबोळे व अन्नदाते लालासाहेब शिंदे यांचा सत्कार केला. शिंदेवाडी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. सोमगोंडा आरबोळे, सरपंच बी. जी. स्वामी, मंडळाचे अध्यक्ष आकाश पाटील, जयवंत दरेकर, आपासो जाधव, निजगुणी स्वामी आदी उपस्थित होते. दत्त पंत भक्त मंडळ व बाल अवधूत संगीत सोंगी भजनी मंडळ, यमुन्नाका महिला मंडळासह गुरु बंधू व भगिनींनी नियोजन केले होते. विक्रम शिंदे यांनी आभार मानले.