संकेश्‍वर-बांदा रस्त्याची नेमकी माहिती द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकेश्‍वर-बांदा रस्त्याची नेमकी माहिती द्या
संकेश्‍वर-बांदा रस्त्याची नेमकी माहिती द्या

संकेश्‍वर-बांदा रस्त्याची नेमकी माहिती द्या

sakal_logo
By

61329
आजरा : येथील तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देताना शिवाजीनगरचे नागरिक.

संकेश्‍वर-बांदा रस्त्याची नेमकी माहिती द्या
आजरा शहरातील नागरिकांची मागणी; तहसीलदारांना निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ : प्रस्तावित संकेश्‍वर-बांदा राष्ट्रीय महामार्गावरील आजरा शहरातील शिवाजीनगर भागात होणाऱ्या रस्त्याची नेमकी माहिती द्यावी, अशी मागणी आजरा शहरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले.
निवेदन म्हटले आहे, सध्या संकेश्‍वर-बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. सदरचा रस्ता आजरा शहरातून जाणार आहे. या रस्त्याच्या दुतर्फा शिवाजीनगर भागातील नागरिकांची घरे गेल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त काळाहून आहेत. काही नागरिकांनी आरसीसी इमारती बांधल्या आहेत. रस्ता रुंदीकरणामुळे इमारीत पाडल्या जाणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळते. त्यामुळे नागरिक अस्वस्थ आहेत. येथील लोक धंदा व्यवसाय याच इमारतीतून करतात. त्यांना उपजीविकेसाठी दुसरे कोणतेही साधन नाही. इथे सर्वांचे धार्मिक अधिष्ठान असलेले ह. भ. प. लक्ष्मणबुवा महाराज यांचे श्री विठ्ठल मंदिर अडीचशे वर्षांपासून आहे. शिवाजी नगर पार कट्टा शंभर वर्षांपासूनचा आहे. त्यामुळे येथील सर्व इमारती, मंदिर पाडली जाणार असल्याचे बोलले जाते. या पुर्वी १९९९ साली आम्ही रस्त्यासाठी विनामोबदला घरे पाडून जागा दिली आहे. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने रस्ता पुन्हा वाढवणार नाही याची लेखी हमी दिली होती. सदर प्रस्तावित महामार्गाची नेमकी माहिती मिळावी. शिवाजी नगरभागात नेमकी किती जागा शासन घेणार याचीही लेखी माहिती मिळावी. तसेच तहसीलदार कार्यालय ते मार्निंग स्टार या मार्गावर एकेरी मार्गावर वाहतूक करावी. त्यामुळे भुसंपादन केले जाणार नाही. या मागण्या पुर्ण झाल्या नाही, तर तीव्र आंदोलन छेडले आहे. शुक्रवारी (ता. १८) रास्ता रोको आंदोलन केले जाईल. या वेळी संबंधित महामार्गाचे अधिकारी, रस्त्याचे ठेकेदार यांना उपस्थित ठेवावेत. भूसंपादन केल्यास आत्मदहन करू. निवेदनावर गणपती डोंगरे, शिवाजी गुडुळकर, अभय जोशी, मानसिंगराव देसाई, प्रज्योत हळदकर, प्रमोद सावंत, केरबा कालेकर, समीर मोरजकर, अरविंद पाटील, सुरेश हरमळकर, दत्तात्रय मोहिते, राजेंद्र कदम, वाय. जी. इंजल, कृष्णा पाटील, दीपक बल्लाळ, लक्ष्मण बनछोडे, सुधीर जाधव, बशीर खेडेकर, विजय गवंडळकर, विवेक बिल्ले यासह शिवाजीनगरातील रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.