गाळेधारक भाडे भरणे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाळेधारक भाडे भरणे सुरू
गाळेधारक भाडे भरणे सुरू

गाळेधारक भाडे भरणे सुरू

sakal_logo
By

61347

गाळेधारकांनी भरले
भाड्यापोटी दहा लाख

कोल्हापूर, ता. ९ ः महापालिकेच्या गाळेधारकांचे २०१५ च्या प्रचलित भाड्याप्रमाणे भाडे भरण्यास आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातर्फे प्रारंभ झाला. प्रत्येक भागातील जवळपास दहा लाख रुपयांचा धनादेश चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या उपस्थितीत उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे सुपूर्द केला.
शासनाच्या ६ एप्रिल २०२२ च्या परिपत्रकाप्रमाणे भाडे भरून घेण्याबाबत उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्यासोबत बैठक झाली. त्यातील वृत्तांत व पुढील दिशा ठरविण्यासाठी चेंबरच्या कार्यालयात शहरातील सर्व गाळेधारकांची बैठक झाली. त्यात सर्व गाळेधारक भाडे भरण्यास तयार असून, हमीपत्राद्वारे २०१५ च्या प्रचलित भाड्यानुसार भाडे भरा अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे आज गाळेधारकांचा जवळपास १० लाख रुपयांचा धनादेश आडसूळ यांच्याकडे जमा केला. उर्वरित गाळेधारकांनी भाडे भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन शेटे यांनी केले. गाळेधारकांचे उर्वरित भाडे भरताना इस्टेट विभाग व गाळेधारकांमध्ये प्रश्न निर्माण होतात. त्यावरही तोडगा काढला. भाडे भरताना काही शंका आल्यास चेंबरच्या कार्यालयाशी संपर्क साधा असेही सांगितले. मानद सचिव वैभव सावर्डेकर, संचालक अजित कोठारी, संपत पाटील, संभाजी पोवार, बबन महाजन, संदीप वीर, सुरेश लिंबेकर, चंद्रकांत कागले, विजय कागले, महेश नष्टे, शिवाजीराव मोटे आदी उपस्थित होते.