जनवादी साहित्य संमेलनाची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनवादी साहित्य संमेलनाची बैठक
जनवादी साहित्य संमेलनाची बैठक

जनवादी साहित्य संमेलनाची बैठक

sakal_logo
By

जनवादी साहित्य संस्कृती
चळवळीची रविवारी बैठक

कोल्हापूर : सावंतवाडीत पहिले जनवादी साहित्य संस्कृती संमेलन झाले. सावंतवाडी संमेलन आयोजकांतर्फे महाराष्ट्र, गोवा, बेळगाव येथील आदी जनांची मराठी भाषा, संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या साहित्यिक, कलावंत, वाचक, विचारवंतांची बैठक रविवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालय, टेंबे रोड येथे होणार आहे. या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन संपत देसाई, अंकुश कदम यांनी केले.
देसाई म्हणाले, ‘‘सावंतवाडी संमेलनानंतर थांबावे, असा विचार होता. मात्र, महाराष्ट्रातून वाचक, कवी, लेखक, जनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आमच्या या कृतीचे स्वागत केले. सावंतवाडी संमेलनानंतर थांबू नका, असे सांगितले. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र, गोवा, बेळगाव आदी मराठी भाषा, संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या सर्वांचा आहे..’’ बैठकीला मिलिंद माटे, मधुकर मातोंडकर, प्रतिभा चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.