मतदार जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार जागृती
मतदार जागृती

मतदार जागृती

sakal_logo
By

61392

सायकल रॅलीतून दिला
मतदार जागृतीचा संदेश
कोल्हापूर, ता. ९ ः मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीतून मतदार जागृतीचा संदेश देण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाचे अधिष्ठाता (सामाजिक शास्त्र) डॉ. एम. एस. देशमुख व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारत येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, लोकशाही सुशासन आणि निवडणूक विभागाचे विद्यापीठ समन्वयक प्रा. डॉ. प्रल्हाद माने उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण इमारतीपासून सुरुवात ते सायबर चौक ते माऊली चौक, नंतर सम्राटनगर, त्यानंतर एनसीसी भवन शिवाजी विद्यापीठ प्रवेशद्वारामार्गे शिवाजी विद्यापीठाच्या जिजामाता सभागृहाजवळ सांगता करण्यात आली. रॅलीत सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.