व्यापारी मृत्यू प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी मृत्यू प्रकरण
व्यापारी मृत्यू प्रकरण

व्यापारी मृत्यू प्रकरण

sakal_logo
By

ही बातमी सातारा आवृत्तीसाठी.
...
लोगो ः व्यापारी मृत्यू प्रकरण...
...
सौमितच्या मित्र-मैत्रिणींची कसून चौकशी

शिरवळ पोलिसांसह एलसीबीचे पथक; पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
सकाळ वृत्तसेवा
शिरवळ, ता. ९ : शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे सांगलीतील तरुण व्यापारी सौमित सुमेध शहा याच्या मृत्यू प्रकरणाचे आज तिसऱ्या दिवशीही गूढ कायम आहे. नातेवाइकांच्या आरोपासह घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना घातपात झाल्याचा संशय बळावल्याने त्या अनुषंगाने तपास यंत्रणा सुरू केली आहे. मृत सौमित याच्या मित्र-मैत्रिणींची आज दिवसभर चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून काही माहिती समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सातारा पोलिस अधीक्षक समीश शेख यांनी आज घटनास्थळी भेट दिली. शिरवळ पोलिसांसह एलसीबी अशा चार पथकांना तपासाच्या सूचना श्री. शेख यांनी दिल्या.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सौमित शहा शनिवारी मित्रांसमवेत व्यवसायानिमित्त पुण्याला चारचाकीने गेला होता. त्यावेळी पुणे येथे आपल्या मित्रांना तेथेच सोडून अर्ध्या तासात परत येतो, असे सांगून तो तेथून निघाला. त्यावेळी तो एकाला भेटायला गेल्याचे मित्रांनी पोलिसांनी सांगितले. दरम्यानच्या काळात त्याचा सौमितचा संपर्क मित्रांना होऊ शकला नाही. त्यानंतर त्याची शोध मोहीम सुरू झाली.
दरम्यान, रविवारी सकाळी दहाच्या सुमारास शिंदेवाडी येथील नीरा नदीपात्रात सौमितचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. उत्तरीय तपासणीत बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले असले, तरी नातेवाईकांनी संशय व्यक्त केला. मृत सौमित शहा याचा पुण्याहून पन्नास ते साठ किलोमीटरवरील नीरा नदीत बुडून मृत्यू कसा झाला? पुण्यात सोडलेल्या मित्रांचा सौमितला रात्री उशिरा झालेला संपर्क, त्यानंतर तर त्यानेच ‘हेल्प’ म्हणून केलेला मेसेज यामुळे संशय बळावला आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणी रात्री पावणेबाराच्या सुमारास खेड-शिवापूरच्या टोलनाक्यावर तो एकटाच गाडीत असल्याचे दिसूनही आले. दरम्यान, सौमितचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. मात्र, तो कसा बुडाला, नदीत पडला कसा, याचा उलगडा होणे आवश्‍यक आहे. पोलिसांनी पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरूवात केली. आज त्याचा मित्र-मैत्रिणींना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून काही माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तांत्रिक तपासाचाही यात महत्त्वाचा भाग असल्यानेही ते स्वतंत्र पथक यासाठी कार्यरत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून खुद्द पोलिस अधीक्षक समीर शेख या तपासावर नजर ठेवून आहेत. आता एलसीबीचेही स्वतंत्र पथक तपासासाठी तैनात आहे.