गायरान जमीन- ऋतूराज पाटील पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायरान जमीन- ऋतूराज पाटील पत्रक
गायरान जमीन- ऋतूराज पाटील पत्रक

गायरान जमीन- ऋतूराज पाटील पत्रक

sakal_logo
By

गायरान जमीन अतिक्रमणप्रश्नी
शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी

आमदार ऋतूराज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर, ता. ९ ः गायरान जमिनीमधील अतिक्रमणधारकांच्या घरांचा प्रश्न हा त्यांचा जीवन -मरणाचा प्रश्न आहे. अतिक्रमणात बांधकामे केलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नात आमदार म्हणून आपण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे. याबाबत राज्य शासनाने सकारात्मक पाऊले उचलावीत, अन्यथा लोकांच्या सोबत राहून तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे पत्रक आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, घर हा प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी गावातील गायरान जमिनीत अनेक कुटुंबे सध्या रहात आहेत. गावठाणमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील लोकांची संख्या वाढल्याने अनेक लोक हे गायरानमध्ये स्थलांतरित झाले आहेत. अनेकांनी कच्ची घरे, पक्की घरे तसेच बंगले बांधले आहेत. आयुष्यभराची कमाई एकत्र करुन, कर्ज काढून, प्रसंगी उसनवारी करुन स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न या लोकांनी पूर्ण केले आहे. आता जर ही घरे काढली तर हे लोक बेघर होणार आहेत. इतके दिवस राहणारे हे लोक जाणार कुठे, हा प्रश्न आहे. गावागावांत या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय लोक एकत्र येऊ लागले आहेत. राज्य शासनाने यामध्ये लक्ष घालून सकारात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे.