नरहर कुरुंदकर नाटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरहर कुरुंदकर नाटक
नरहर कुरुंदकर नाटक

नरहर कुरुंदकर नाटक

sakal_logo
By

61418
...

नरहर कुरुंदकरांवरील
नाटकाचा मंगळवारी प्रयोग

कुरुंदकरांच्या विचारांचे दर्शन घडवणारे नाटक

कोल्हापूर, ता. ९ : ‘नरहर कुरुंदकर - एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ या साभिनय अभिवाचनाचा प्रयोग मंगळवारी (ता. १५) सायंकाळी सातला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत हा प्रयोग असून कला क्षेत्रातील निर्मिती ग्राफिक्स व ॲडव्हर्टायजिंग या नामांकित संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अनंत खासबारदार आणि शिरीष खांडेकर यांनी प्रयोगाचे आयोजन केले आहे. अथांग होमस्टे रिसॉर्ट यांच्या सहकार्याने हा प्रयोग होणार असून तो निःशुल्क आहे.
नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी जवळपास २० प्रयोग होत आहेत. कोल्हापूरचा हा पहिला प्रयोग आहे. कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहे, प्रभावीपणे मांडणारे हे रंगमंचीय सादरीकरण आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, राजीव किवळेकर, बालकलाकार शुभंकर देशपांडे, लेखक-दिग्दर्शक अजय अंबेकर आणि प्रसिद्ध दूरदर्शन वृत्त निवेदिका ज्योती अंबेकर यांचा त्यात सहभाग आहे.
नरहर कुरुंदकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. इतिहास, राजकारण, नाट्यशास्त्र, स्वातंत्र्यलढा, संगीत, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांवरील मूलगामी मते सडेतोडपणे मांडून त्यांनी अवघे विचारविश्‍व हादरवून सोडले होते. पुरोगामी विचाराच्या मांडणीबरोबरच अनेक साहित्यिक, सांस्कृतिक संस्था उभारणीला त्यांनी मोठे पाठबळ दिले होते. या सर्व पैलूंची अत्यंत रंजक मांडणी या प्रयोगात करण्यात आली आहे. मोफत प्रवेशिका केशवराव भोसले नाट्यगृह, निर्मिती ग्राफिक्स, भालजी पेंढारकर कलादालन, अक्षर दालन येथे उपलब्ध आहेत.