किरणोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरणोत्सव
किरणोत्सव

किरणोत्सव

sakal_logo
By

61402
मावळतीच्या सूर्यकिरणांचा चरणस्पर्श
---
धूलिकणांचाही अभ्यास, करवीर निवासिनी अंबाबाईचा किरणोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाला प्रारंभ झाला असून, आज मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. दुपारी चार वाजून ५९ मिनिटांनी मावळतीच्या सूर्यकिरणांनी महाद्वार प्रवेशद्वाराजवळ प्रवेश केला. सायंकाळी पाच वाजून ४६ मिनिटांनी चरणस्पर्श करून ती मूर्तीच्या डावीकडे लुप्त झाली. दरम्यान, सलग पाच दिवस हा सोहळा होणार असून, भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात तीन ठिकाणी एलईडी स्क्रीन लावले आहेत. देवस्थान समितीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही सोहळ्याचे थेट प्रसारण केले जात आहे.
वर्षातून दोनदा ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी आणि ९ ते ११ नोव्हेंबर या काळात किरणोत्सवाचा सोहळा होतो. पण, खगोलीय घडामोडींमुळे या तारखांमध्ये बदल झाला आहे का, याचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी तीन वर्षांपासून पाच दिवसांचा हा सोहळा देवस्थान समितीने जाहीर केला असून, प्रत्येक किरणोत्सवाच्या रोजच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. किरणोत्सव मार्गात धूलिकणांचा अडथळा येतो का, हे तपासण्यासाठी या किरणोत्सवात ॲनिमोमीटरचा वापर केला आहे. या मीटरच्या सहाय्याने वाऱ्याचा वेग मोजता येतो. वाऱ्याचा वेग अधिक असेल तर धूलिकण मोठ्या संख्येने आडवे येतात आणि त्याचा किरणोत्सवात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. पण, वाऱ्याचा वेग योग्य असून, तीन वर्षांच्या तुलनेत किरणांची तीव्रता दक्षिणायन काळात तिपटीने वाढली असल्याचे विवेकानंद महाविद्यालयाच्या खगोलशास्त्र व पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.
............

किरणांचा प्रवास असा ः
- महाद्वार प्रवेशद्वार ः दुपार चार वाजून ४६ मिनिटे, - गरुड मंडप मागील बाजू ः सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटे,
- गणपती चौक ः पाच वाजून ३० मिनिटे, - पितळी उंबरा- पाच वाजून ३२ मिनिटे,
- चांदीचा उंबरा ः पाच वाजून ३९ मिनिटे, - संगमरवरी पायरी ः पाच वाजून ४२ मिनिटे,
- चरणस्पर्श ः पाच वाजून ४६ मिनिटे