जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जल्लोष
जल्लोष

जल्लोष

sakal_logo
By

राऊत यांच्या सुटकेनंतर शिवसैनिकांचा जल्लोष
कोल्हापूर, ता. ९ : कथित पत्राचाळ प्रकरणी अटक केलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची तब्बल शंभर दिवसांनी न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर शिवसैनिकांकडून राज्यभर जल्लोष करण्यात आला. कोल्हापुरातही शिवसेना ठाकरे गटातर्फे वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकात फटाके वाजवत आणि पेढे वाटून जल्लोष केला.
या वेळी बोलताना वरुण सरदेसाई यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला. ते म्हणाले, ‘‘जो कोणी भाजपच्या किंवा सरकारचे विरोधात बोलेल त्याच्यावर चौकशीचे दबावतंत्र वापरले जाते. जो खरोखर विरोधात बोलत राहतो त्याला जेलमध्ये टाकले जाते. परंतु जो त्यांचे धोरण स्वीकारतो त्याची प्रतिमा स्वच्छ होऊन तो भाजपच्या कंपनीमध्ये जातो. परंतु संजय राऊत यांनी जेलमध्ये जाणे पसंत केले. हा सच्चा शिवसैनिकांचा बाणा आहे. त्यांची न्यायालयाकडून सुटका हा शिवसैनिकांसाठी महत्त्‍वाचा दिवस आहे.’’
या वेळी संजय पवार म्हणाले, ‘‘न्यायालयानेच ही अटक बेकायदेशीर असल्याचे विधान केल्याने ईडीची कारवाई बोगसच होती हे शाबित झाले आहे. शिवसैनिकांनी एकमेकाला पेढे भरवून आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.’’ या वेळी जिल्हाध्यक्ष विजय देवणे, रवी इंगवले, माजी आमदार उल्हास पाटील, सुनील मोदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.