पुलकित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुलकित
पुलकित

पुलकित

sakal_logo
By

61431
....
उत्स्फूर्त प्रतिसादात रंगली ‘पुलकित'' मैफल

पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त अनोखी आनंदवारी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा ‘पुल'' म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान. ते एक लोकप्रिय साहित्यिक, अभिनेता, पटकथाकार, संगीतकार आणि गायकही. त्यांच्या या साऱ्या पैलूंचे दर्शन घडवत राजाराम कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आज कोल्हापूरकरांना जणू एक आनंदवारीच घडवली. निमित्त होते, पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘पुलकित'' या मैफलीचे. राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दोन तासांहून अधिक काळ ही दृकश्राव्य मैफल रंगली. सकाळ माध्यम समूह- यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. दरम्यान, ही मैफल केवळ कॉलेजपुरतीच मर्यादित न राहता तिचे आयोजन विविध औचित्य साधून सर्वत्र व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी आवर्जून व्यक्त झाली.
‘माझे जीवनगाणे‘ गीताने रंगमंचाचा पडदा उघडला आणि एकाहून एक सरस गीतांसह ‘पुलं‘च्या आठवणी, विविध भाषणं, मुलाखती, कविता, नाट्यप्रवेश, चित्रपटांतील प्रसंगांचा सुरेख संगम साधत मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, ‘कबिराचे विणतो दोहे‘, ‘हसले मनी चांदणे’, ‘नाच रे मोरा’, ‘माझिया माहेरा जा’, ‘शब्दावाचून कळले सारे’ आदी गीतांनी मैफलीची उंची आणखीन वाढवली.
प्राजक्का भिलुगडे, प्रणित घस्ते, शीतल पोतदार, प्राची बोटे यांचा स्वरसाज होता. वैभव शिंत्रे (तबला), सुनील पाटील (पखवाज), गुरू ढोले (ॲक्टोपॅड), प्रदीप जिरगे (कीबोर्ड), नीलेश अस्वले (हार्मोनियम) यांची साथसंगत होती. भारतजीवन प्रभूखोत, श्रीशैल पाटील, ज्योती गुरव, शांभवी देसाई यांचे निवेदन होते. संजना वरूटे यांचा नृत्याविष्कारही मैफलीत सजला. संताजी पाटील, श्रीधर जाधव यांचे नेपथ्य होते.
दरम्यान, कॉलेजचे माजी विद्यार्थी गुरूनाथ हेर्लेकर, प्रा.सचिन जगताप, शिक्षण सहसंचालक हेमंत कठरे, प्राचार्य डॉ.वाय. सी. शेख, सुधर्म वाझे, ‘सकाळ''चे वरिष्ठ बातमीदार संभाजी गंडमाळे, ‘यिन''चे विभागीय व्यवस्थापक अवधूत गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत मैफलीला प्रारंभ झाला. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. संजय पाठारे, डॉ. अंजली पाटील, अविनाश देशमुख, ऋतूजा पाटील, तन्मय राऊत आदींचे संयोजन होते.
...........