दिवाळीचे फटाके आता उडवणार ः वरूण देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीचे फटाके आता उडवणार ः वरूण देसाई
दिवाळीचे फटाके आता उडवणार ः वरूण देसाई

दिवाळीचे फटाके आता उडवणार ः वरूण देसाई

sakal_logo
By

दिवाळीचे फटाके आता उडवणार

वरुण सरदेसाई : संजय राऊत यांच्या सुटकेवर आनंद व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ९ ः शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला, अंधेरी पोटनिवडणुकीत विजय मिळाला. त्यामुळे आम्ही आता दिवाळीचे फटाके उडवणार आहोत, अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी दिली. शाहू स्मारक भवन येथे शिवसैनिकांनी राऊत यांच्या सुटकेचा आनंद घोषणा देऊन साजरा केला.
वरुण सरदेसाई हे विद्यापीठ निवडणुकीतील शिव-शाहू आघाडीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाला आणि ते शंभर दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले. याचा आनंदोत्सव शिवसैनिकांनी केला. या वेळी त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. या प्रसंगी वरुण सरदेसाई म्हणाले, ‘‘दिवाळीला आम्ही फटाके शिल्लक ठेवले होते. आज आनंदाचा दिवस आहे. अंधेरीतील विजय आणि राऊत यांची सुटका या निमित्ताने आम्ही ते फटाके उडवणार आहोत.’’ या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, रविकिरण इंगवले, मनजित माने उपस्थित होते.