वाई, प्रतापगडावर फौजफाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाई, प्रतापगडावर फौजफाटा
वाई, प्रतापगडावर फौजफाटा

वाई, प्रतापगडावर फौजफाटा

sakal_logo
By

वाई, प्रतापगडावर
फौजफाट्यामुळे चर्चेला उधाण
सातारा, ता. ९ : प्रतापगडावर बाहेरील जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त मागवल्याची बातमी आल्याने रात्री अफजलखान कबरीचे अतिक्रमण पाडणार असल्याच्या चर्चांना जिल्ह्यात उधाण आले होते. दरम्यान, महाबळेश्वर बाजारपेठेतून रात्री पोलिस गाडी फिरल्यामुळे अतिक्रमण प्रतापगडावरचे की बाजारपेठेतले याबाबत महाबळेश्वरकरांमध्ये चर्चा सुरू झाली होती.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अशी कोणतीही कारवाई होणार असल्याची माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. त्यावरून अनेकदा आंदोलने ही झाले. न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमी बंदोबस्त असतो. आज सायंकाळी परजिल्ह्यातून साताऱ्यात बंदोबस्त मागवल्यामुळे अफजलखान कबरीचे अतिक्रमण काढणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर बाजारपेठेची पाहणी करत अतिक्रमण हटविण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे कबरीचे की बाजारपेठेतील अतिक्रमण याबाबत महाबळेश्वरकरांमध्ये चर्चा सुरू झाली होती. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील बंदोबस्त वाईमध्ये बोलावण्यात आला होता. सर्व बंदोबस्तावरील पोलिसांची व्यवस्था एका मंगल कार्यालयात केल्याची माहिती मिळत होती. त्यामुळे वाईकरांमध्ये चर्चांना उधाण आले होते.
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले, ‘‘अशा कोणत्याही चर्चांमध्ये तथ्य नाही. नागरिकांनी कोणत्याही फोनवर विश्वास ठेवू नये. बाहेर जिल्ह्यातून बंदोबस्त मागवणे ही नेहमीचीच पद्धत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अशा कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे सांगितले. महाबळेश्वरच्या तहसीलदारांनी या गोष्टीचा इन्कार केला.