घाळी महाविद्यालयात पाककला प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाळी महाविद्यालयात पाककला प्रदर्शन
घाळी महाविद्यालयात पाककला प्रदर्शन

घाळी महाविद्यालयात पाककला प्रदर्शन

sakal_logo
By

घाळी महाविद्यालयात पाककला प्रदर्शन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात रानभाज्या पाककला प्रदर्शन झाले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. डॉ. पाटील यांनी रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्व सांगितले. हादगा, आघाडा, पाथरी, आळू, सुरण, भोपळा, कांगुणी, आंबाडा, घोळ आदी रानभाज्यांच्या पाककृती प्रदर्शनात मांडल्या होत्या. प्रा. व्ही. एस. खोराटे, प्रा. ए. ए. पट्टणशेट्टी, प्रा. पी. एस. रजपूत, डॉ. एस. ए. मस्ती, डॉ. एस. ए. आरबोळे आदी उपस्थित होते. प्रा. आर. बी. पोरे यांनी स्वागत केले. डॉ. आर. एस. सावंत यांनी आभार मानले.