यिन कलामहोत्सावात घाळीचे लोकनृत्य तिसरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन कलामहोत्सावात घाळीचे लोकनृत्य तिसरे
यिन कलामहोत्सावात घाळीचे लोकनृत्य तिसरे

यिन कलामहोत्सावात घाळीचे लोकनृत्य तिसरे

sakal_logo
By

61475
----------------------------
यिन कलामहोत्सावात
घाळीचे लोकनृत्य तिसरे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : ऋतुराज पाटील फाउंडेशन प्रस्तुत ‘सकाळ’ यिन कला महोत्सावात येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या लोकनृत्याने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच कातरकाम स्पर्धेत प्रथमेश इंगळे याने दुसरा क्रमांक मिळवला. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथे हा महोत्सव झाला.
घाळी महाविद्यालयाने सादर केलेल्या लोकनृत्यात हर्षदा सावंत, साक्षी नाईक, समृद्धी महाडिक, कोमल पाटील, सोनाली पाटील, दीपाली रामनकाटे, तृप्ती वाघराळकर, आरती जाधव या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांना सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. महेश कदम, प्रा. राजश्री पोरे, डॉ. नीलेश शेळके, प्रा. मयूरी म्हंकावे, प्रा. नेहा जगदाळे, प्रा. राधिका हुल्लगबाळी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी व संचालकांचे प्रोत्साहन मिळाले. संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्याहस्ते विद्यार्थिनींचा सत्कार केला.