टाटा टेक्नॉलॉजीकडून शरद इंजिनिअरिंगच्या संकल्पनेची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाटा टेक्नॉलॉजीकडून शरद इंजिनिअरिंगच्या संकल्पनेची निवड
टाटा टेक्नॉलॉजीकडून शरद इंजिनिअरिंगच्या संकल्पनेची निवड

टाटा टेक्नॉलॉजीकडून शरद इंजिनिअरिंगच्या संकल्पनेची निवड

sakal_logo
By

61532
----------
टाटा टेक्नॉलॉजीकडून ‘शरद’च्या संकल्पनेची निवड
मानवी शरीरातील उष्णतेवर रेट्रोफिट; मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांचे यश
दानोळी, ता. १० ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी ''इनोव्हेटीव्ह आयडिया अॅक्सिलरेटर प्रोग्रॅम''मध्ये सादर केलेल्या संकल्पनेची पुढील संशोधनासाठी निवड झाली आहे. टाटा टेक्नॉलॉजी आणि गोशिमातर्फे (गोकुळ शिरगांव इंडस्ट्रीअल मॅन्युपॅक्चरिंग असोसिएशन) स्पर्धांचे आयोजन केले होते.
मेकॅनिकल विभागातील सुरज लाल, शुभम पोवार, आदित्य आमणे, अरुण कागवाडे, दिया सनदी, पूनम चौगुले, राजश्री शिंदे या विद्यार्थ्यांनी ‘रेट्रोफिट ऑन व्हीलचेअर फॉर पॅरालंपिक स्पोर्टस पर्सन विथ अॅप्लिकेशन ऑफ हिट पाईप’ ही संकल्पना सादर केली. ती पॅरालंपिक स्पोर्टसमन व अपंग व्यक्तींना उपयोगी आहे. शरिरात जास्त प्रमाणात निर्माण होणारी उष्णता कमी करुन प्रेशर अल्सर व त्वचेचे रोग प्रतिबंध करण्यासाठी हे रेट्रोफिट उपयुक्त ठरणार आहे. पहिल्या फेरीत शेकडो संकल्पनेतून (प्रॉब्लेम स्टेटमेंट) पहिल्या दहा संघांची निवड केली. त्यातून सादरीकरणाच्या आधारावर पहिल्या पाच संकल्पनांना निधी दिला आहे. शरद इंजिनिअरिंगच्या संकल्पनेला ५० हजारांचा निधी दिला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. अवेसअहेमद हुसेनी, समन्वयक प्रा. शितल उदगांवे, विभागप्रमुख डॉ. एस. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.