कचेरी मार्गावर कोसळली फांदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचेरी मार्गावर कोसळली फांदी
कचेरी मार्गावर कोसळली फांदी

कचेरी मार्गावर कोसळली फांदी

sakal_logo
By

61539
-----------------------------
कचेरी मार्गावर कोसळली फांदी
दुचाकी, झेरॉक्स सेंटरचे किरकोळ नुकसान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील नेहमी रहदारी असणाऱ्या कचेरी मार्गावर झाडाची फांदी कोसळली. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र, एका दुचाकीचे व झेरॉक्स सेंटरचे किरकोळ नुकसान झाले.
पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनमुळे येथील कचेरी मार्गावर नागरिकांची नेहमी वर्दळ असते. बॅ. नाथ पै विद्यालयाच्या बाजूला झाडे आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास पंचायत समितीच्या बाजूला असणाऱ्या एका झाडाची फांदी अचानक कोसळली. झाडाशेजारी मारुती मगदूम यांचे झेरॉक्स सेंटर आहे. फांदी कोसळल्यामुळे या सेंटरचे किरकोळ नुकसान झाले. तसेच सेंटरच्या बाजूला दुचाकी उभा होती. फांदी पडल्याने या दुचाकीचेही नुकसान झाले. रस्त्याकडेला असणाऱ्या झाडांच्या वाळलेल्या फांद्या नगरपालिकेने काढून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.
कचेरी मार्गावर नागरिकांची नेहमी वर्दळ असते. सुदैवाने फांदी कोसळली यावेळी रस्त्यावर कोणी नव्हते. ही झाडे रेनट्रीची आहेत. यातील काही झाडांच्या फांद्या वाळलेल्या आहेत. आज कोसळलेली फांदी वाळलेलीच होती. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या झाडांच्या वाळलेल्या फांद्या नगरपालिकेने काढून घ्याव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.