महासंघातर्फे रविवारी ब्राह्मण शेतकरी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महासंघातर्फे रविवारी 
ब्राह्मण शेतकरी मेळावा
महासंघातर्फे रविवारी ब्राह्मण शेतकरी मेळावा

महासंघातर्फे रविवारी ब्राह्मण शेतकरी मेळावा

sakal_logo
By

ब्राह्मण महासंघातर्फे
रविवारी शेतकरी मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे रविवारी (ता. १३) ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हॉकी स्टेडियम जवळील विश्‍वपंढरी येथे सकाळी ९.३० वाजता मेळाव्याचे उद्‍घाटन होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातून शेतकरी सहभागी होणार असून कृषी क्षेत्रातील सर्व विषयांवर मेळाव्यात चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती महासंघाच्या शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विवेक जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी महासंगाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी प्रमुख उपस्थित होते.
विवेक जोशी म्हणाले, ‘‘या मेळाव्याचे आयोजन जरी ब्राह्मण महासंघाने केले असले तरी यामध्ये सर्व जाती, धर्माचे शेतकरी सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, शेतीचे आर्थिक व्यवस्थापन व नियोजन, पारंपरिक शेती, शेतीतील नवीन तंत्रज्ञान अशा विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तण, कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होत असलेला कामगार तुटवडा या बाबींवर मेळाव्यात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याबाबत शेतकऱ्यांत प्रबोधन करण्यासाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क दौरे केले आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले शेतकरी मेळाव्याला येणार आहेत. मेळाव्याचे उद्‍घाटन श्री सद्‌गुरू विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या हस्ते होईल. या वेळी ब्राह्ममण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, आमदार सतेज पाटील, प्रकाश आवाडे, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.’’ या पत्रकार परिषदेला शेतकरी आघाडीचे उपाध्यक्ष हरिष शिंदे, गोपाळ कुलकर्णी हे उपस्थित होते.