इचलकरंजीत आज बांधकाम विषयक कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत आज बांधकाम विषयक कार्यशाळा
इचलकरंजीत आज बांधकाम विषयक कार्यशाळा

इचलकरंजीत आज बांधकाम विषयक कार्यशाळा

sakal_logo
By

इचलकरंजीत आज
बांधकामविषयक कार्यशाळा
इचलकरंजी, ता. १० ः बिल्डर असोसिएशन, क्रेडाई, इंजिनियर्स अॅण्ड आर्किटेक्ट्स असोसिएशन, रोटरी क्लब सेंट्रलतर्फे ‘कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री टर्निंग वेस्ट टू वेल्थ’ या विषयावर अभियंता सुधीर हांजे (कोल्हापूर) यांची कार्यशाळा होणार आहे. रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र (नाकोडानगर) येथे ११ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहाला कार्यशाळा होणार आहे. याबाबतची माहिती संयोजक संस्थांतर्फे नितीन धूत, मयूर शहा, विवेक सावंत, अशोक जैन यांनी दिली.
यानिमित्त बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांचा सन्मान महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यात गुणवंत कामगारांत सेंट्रिंग राजू घुणके, अंकुश मोहिते, बांधकाम हनुमान धोत्रे, गिलावा मुरलीधर पाटील, सुतारकाम कानाराम सुतार, इंटरनल पेंटिंग राजकरण शर्मा, एक्स्टर्नल पेंटिंग विठ्ठल कदम, प्लंबिंग कुबेर लोहार, इलेक्ट्रिशियन राजू सवाईराम, फरशीकाम रमेश प्रजापती, वॉटर प्रूफिंग युनूस गवंडी, फॅब्रिकेशन उमरफारूक दाढीवाले यांचा समावेश आहे. निवड समितीत रमेश मर्दा, महांतेश कोक्कळकी, सुहास अकीवाटे, सुधाकर झोले, शीतल काजवे यांचा समावेश होता.