आयटकचे राज्य अधिवेशन १८ पासून कोल्हापूरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटकचे राज्य अधिवेशन
१८ पासून कोल्हापूरात
आयटकचे राज्य अधिवेशन १८ पासून कोल्हापूरात

आयटकचे राज्य अधिवेशन १८ पासून कोल्हापूरात

sakal_logo
By

आयटकचे राज्य अधिवेशन
१८ पासून कोल्हापूरात
कोल्हापूर , ता. ९ ः आयटकचे राज्य अधिवेशन येत्या १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूरात होणार आहे. या निमित्ताने राज्यभरातील कामगार नेत्यांचे मार्गदर्शन होणोर आहे. शाहू स्मारक भवनात होणाऱ्या अधिवेशनाचे माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे अशी माहिती आयटकचे उपाध्यक्ष दिलिप पोवार, एस. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आल इंडीया बॅंक एम्पालाईज असोसिएशनचे राष्ट्रीय सी. एन. देशमुख, राज्य सरचिटणिस, शाम काळे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामगार नेते प्रा. तानाजी ठोंबरे यांचे ‘राजर्षी शाहू महाराजांचे कामगार विषयक धोरण.’ या विषयावर व्याख्यान होईल, तर रात्री शाहीर सदाशिव निकम यांचे शाहीर पोवाड्याचा कार्यक्रम रात्री आठ वाजता होणार आहे.
दुसऱ्या दिवसी १९ नोव्हेंबरला राजकीय संघटनात्मक अहवाल, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवका, बांधकाम कामगार, शालेय पोषण आहार, ग्रामपंचायत कर्मचारी, कोळसा कामगार, घरेलु कामागर यांच्या विविध मागण्या या चर्चासत्र होणार आहे. त्यानंतर सायंकाळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांचे ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आयटकचे योगदान’ या विषयावर व्याख्यान होईल. तर २० नोव्हेंबरला आयटकच्या राज्य कौन्सीलची निवड होईल. याच दिवशी सकाळी साडे आकर वाजता रॅली निघणार आहे. दुपारी दोन वाजता आयटकचे राष्ट्रीय महासचिव अमरजीत कौर यांची ही जाहिर सभा होणार आहे. या अधिवेशनाला राज्यभरातील आयटकचे कामगार नेते पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत असे ही यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.