डॉ. संजय पाटील यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. संजय पाटील यांना पुरस्कार
डॉ. संजय पाटील यांना पुरस्कार

डॉ. संजय पाटील यांना पुरस्कार

sakal_logo
By

61591

इंडिया अॅग्री बिझनेस अॅवॉर्डने
डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान

कोल्‍हापूर, ता. १० ः डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे कुलपती डॉ. संजय पाटील यांना ‘इंडिया अॅग्री बिझनेस अॅवॉर्ड-२०२२’ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय दुग्ध, पशुपालन व मत्स्य संवर्धन राज्यमंत्री संजीवकुमार बालियान व हरियाणाचे कृषिमंत्री जे. पी. दलाल यांच्या हस्ते डॉ. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.
इंडियन चेंबर ऑफ फूड अँड अॅग्रिकल्चर, नवी दिल्ली येथील नास कॉम्प्लेक्समधील ए.पी. शिंदे सभागृहात बुधवारी हा सोहळा झाला. यावेळी सर्बियाचे राजदूत हिज एक्सलन्सी सिमसा पविक, नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद, फिलिपाईन्सचे माजी कृषी सचिव डॉ. विल्यम दार, जम्मू आणि काश्मीर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ बलदेव प्रकाश, आयसीएफएचे चेअरमन डॉ. एम. जे. खान, सचिव डॉ. एन. के. दादलानिया उपस्थित होते. २०२२ च्या या पुरस्कारांसाठी आयसीएफएने नीती आयोगाचे सदस्य डॉ. चंद यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय उच्चाधिकार निवड समिती स्थापन केली. या समितीने ‘इंडिया अँग्री बिझनेस ॲवॉर्ड २०२२’च्या २१ श्रेणीमधील पुरस्कार विजेत्यांची निवड केली. यामध्ये १९ कृषी व्यवसाय कंपन्या आणि दोन व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये डॉ. संजय डी. पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल व शेती प्रणालीमध्ये अवलंबलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या धर्तीवर या पुरस्कारासाठी निवड केली. यावेळी डी. वाय. पाटील कृषी नवा तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील आदी उपस्थित होते.