मेन राजारामचे स्‍थलांतर करु नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेन राजारामचे स्‍थलांतर करु नका
मेन राजारामचे स्‍थलांतर करु नका

मेन राजारामचे स्‍थलांतर करु नका

sakal_logo
By

१५ दिवसांत शासनाने भूमिका
जाहीर न केल्यास आंदोलन
...
मुख्यमंत्र्यांना तातडीचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ११ : मेन राजाराम हायस्‍कूल संस्‍थेची जुना राजवाडा येथील इमारतीचे स्‍थलांतर करून या ठिकाणी इतर व्यवसाय, अन्य प्रयोजन करण्याचा शासनाचा इरादा दिसून येत आहे. मात्र, ही ऐतिहासिक वारसा असलेली शाळा आहे. कोल्‍हापूरच्या जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मेन राजारामच्या स्‍थलांतराचा विचार सोडून द्यावा. तसेच याबाबत १५ दिवसांच्या आत शासनाकडून भूमिका जाहीर करावी, अन्यथा आंदोलन सुरू करण्याचा इशारा मुंबई उच्‍च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजीराव नलवडे, निवृत्त सरकारी अभियोक्‍ता व ज्येष्‍ठ विधिज्ञ चंद्रकांत बुधले, ॲड. के. बी. पडवळे, अशोक सुतार यांनी दिला आहे. हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
मुळात निवेदन देणारे आम्‍ही सर्वजण मेन राजारामचे विद्यार्थी आहोत. ही शाळा संस्‍थान काळातील आहे. या शाळेस ऐतिहासिक वारसा आहे. सामाजिक न्यायाच्या विचारातून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. जुन्या कोल्‍हापूरमधील व कोल्‍हापूर शहराच्या ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आजही अखंड ज्ञानदानाचे काम सुरूच आहे. या शाळेशी कोल्‍हापूरकरांचे भावनिक नाते आहे. या शाळेच्या बचावासाठी आम्‍ही आमचे प्राणही देऊ शकतो, एवढे या शाळेशी भावनिक नाते आहे. त्यामुळेच शासनाने मेन राजारामच्या स्‍थलांतराचा विचार सोडून द्यावा, अशी मागणी केली आहे.