स्वच्छतेबाबत चालढकलीपणा, आरोग्य निरीक्षकाला नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतेबाबत चालढकलीपणा,
आरोग्य निरीक्षकाला नोटीस
स्वच्छतेबाबत चालढकलीपणा, आरोग्य निरीक्षकाला नोटीस

स्वच्छतेबाबत चालढकलीपणा, आरोग्य निरीक्षकाला नोटीस

sakal_logo
By

61601
कोल्हापूर ः विविध ठिकाणच्या स्वच्छतेची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

स्वच्छतेबाबत चालढकलपणा,
आरोग्य निरीक्षकाला नोटीस
कोल्हापूर, ता. १० ः शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक ड्रेनेज सफाई, रस्ते, गटर सफाईच्या कामाची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. सूचना देऊनही सर्किट हाऊस परिसरात कचरा उठाव केला नसल्याने बलकवडे यांनी एका आरोग्य निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावली.
आदित्य कॉर्नर येथील नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने ड्रेनेज लाईन सफाईच्या कामाची, तसेच प्रिन्स शिवाजी विद्यालय, गंगाई लॉन येथील गटर स्वच्छतेची पाहणी केली. अष्टविनायक तरुण मंडळ, दादू चौगुलेनगर या परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनुसार स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांना सूचना दिल्या. तसेच खराब झालेले गटर, चॅनेल दुरुस्त करून घेण्याच्या सूचना उपशहर अभियंता एन. एस. पाटील यांना दिल्या. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, जल अभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता आर. के. पाटील, अवधूत नर्लेकर, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, करण लाटवडे, शिवाजी शिंदे, ऋषीकेश सरनाईक, राजेंद्र पाटील, मुकादम उपस्थित होते.
सर्किट हाऊस परिसरात पाहणी करताना प्रशासकांना कचरा उठाव केलेला नाही व कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईही केली नसल्याचे दिसून आले. वारंवार सूचना देऊनही कचरा उठाव केला नसल्याबद्दल आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांना एक हजार रुपये दंड का करण्यात येऊ नये, याचा तीन दिवसांत खुलासा देणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खुलासा न आल्यास पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.