कोंडाळे सुशोभीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडाळे सुशोभीकरण
कोंडाळे सुशोभीकरण

कोंडाळे सुशोभीकरण

sakal_logo
By

61599
कोल्हापूर ः कचरा टाकण्याच्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये, यासाठी महापालिकेतर्फे तिथे सुशोभीकरण करण्यात येत आहे.

कचरा टाकण्याच्या ठिकाणांचे सुशोभीकरण
१०० ठिकाणी होणार रंगरंगोटी; दलदलीच्या जागी खरमाती टाकणार
कोल्हापूर, ता. १० ः महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहर सुशोभीकरणाअंतर्गत कोंडाळ्याच्या १०० ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. खड्डा असलेल्या जागी व दलदलीच्या ठिकाणी खरमाती टाकून जागा सपाटीकरण करण्यात येत आहे.
नागरिकांनी कोंडाळ्याच्या परिसरात कचरा टाकू नये, यासाठी त्या ठिकाणांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. पहिल्या टप्यात मंगळवार पेठ येथील शिवराज विद्यालय, भक्तीपूजा नगर चौक, शेळके उद्यान, हनुमाननगर, सासणे कॉलनी, राजारामपुरी येथील जगदाळे हॉल जवळील कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणी सफाई व रंगरंगोटीने सुशोभीकरण करण्यात आले. उर्वरित ९५ ठिकाणी टप्याटप्याने सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. चारही विभागीय कार्यालयातर्फे हे काम करण्यात येणार आहे.
---------------
चौकट
नागरिकांची सवय मोडण्यासाठी
कचरा संकलनासाठी महापालिकेने टिपरची व्यवस्था केली आहे. त्यासाठी कोंडाळे हटविले आहेत; पण अनेक नागरिक वेगवेगळी कारणे सांगून पुन्हा कोंडाळ्याच्या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे दिसत होते. हा प्रकार रोखण्यासाठी, नागरिकांची सवय मोडण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. कोंडाळ्याच्या ठिकाणी सफाई करून रंगरंगोटी केल्यानंतर तिथे कचरा टाकण्यास नागरिक धजावणार नाहीत, असा प्रशासनाचा कयास आहे.