शिवाजी पार्क ४ लाख ५१ हजाराची घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी पार्क ४ लाख ५१ हजाराची घरफोडी
शिवाजी पार्क ४ लाख ५१ हजाराची घरफोडी

शिवाजी पार्क ४ लाख ५१ हजाराची घरफोडी

sakal_logo
By

फोटो : ६१६३०

शिवाजी पार्कमध्ये
साडेचार लाखांची घरफोडी
दागिन्‍यांसह रोख रक्कम पळविली; इमारतीत तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः शिवाजी पार्क मधील नक्षत्र हाइट्स इमारतीमधील फ्लॅट ३ मध्ये मंगळवारी मध्यरात्री कडी कोयंडा उचकटून घरफोडी झाली. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे ४ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. याबद्दलची तक्रार धनाजीराव शामराव पाटील (वय ५८) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. विशेष म्हणजे याच इमारतीमधील आणखी तीन फ्लॅटमध्ये कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. मात्र येथून कोणताही ऐवज चोरीला गेलेला नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी पाटील हे कुटुंबासोबत परगावी गेले होते. त्यामुळे फ्लॅट बंद होता. मंगळवारी (ता. ९) मध्यरात्री चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी घरातील कपाट उघडून सोन्याचे दागिने लंपास केले. यामध्ये ४५ ग्रॅम वजनाचे गंठण, ५० ग्रॅम वजनाचे तोडे, १५ ग्रॅम वजनाचे नेकलेस, १० ग्रॅम वजनाचे कर्णफुले जोड, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची आंगठी, ५ ग्रॅम वजनाचे कानातील रिंग, चांदीचा छल्ला, जोडवी, मोत्याची माळ असा ऐवज आहे. तसेच ५५ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी पळवली. असा सुमारे ४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
या वेळी चोरट्यांनी याच इमारतीमधील त्यात मजल्यावरील फ्लॅट क्रमांक टी २, टी ४ आणि एफ २ या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला.
चौकट पान १ वर
तीन संशयित रडारावर
पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या वेळी ठसेतज्‍ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हाती घेतले असून त्यामध्ये तीन संशयित दिसून आले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.