रिपब्लिकन पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपब्लिकन पार्टी
रिपब्लिकन पार्टी

रिपब्लिकन पार्टी

sakal_logo
By

‘गोरगरिबांचे संसार उद्‌ध्वस्त करू नयेत’
कोल्हापूर ,ता. १० ः अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली गोरगरीबांचे संसार उद्‌ध्वस्त करू नका, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी दिला.
श्री. कांबळे यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी की, गरजू घटकातील अनेकजण तसेच शेतकरी, शेतमजूर, गायरान, शासकीय जमिनीत निवारा केला आहे. शासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे निवारे काढण्याचे आयोजन केले आहे. संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा शासनाने पुरविण्याची जबाबदारी आहे, असे निवारे काढले तर लोकांच्या जगण्याचे प्रश्न गंभीर होणार आहे. या बाब उच्च न्यायालयाचा आदेशाचा संर्दभ देत शासन अतिक्रमणे काढणार असेल तर शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी अशी मागणी करीत आहोत. शहरातील भूमाफिया व श्रीमंतांनी बेकायदा अतिक्रमण केलेल्या जमिनीही ताब्यात घ्याव्यात. यातूनही शासनाने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली तर तीव्र आंदोलन करू, असेही निवेदनात म्हटले आहे. बाळासाहेब वाशीकर, राजेंद्र ठिकपुर्लीकर, गुणवंत नागटिळे, अविनाश शिंदे, दिलीप कांबळे, प्रदीप मस्के, तानाजी कांबळे यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.