आबिटकर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आबिटकर बातमी
आबिटकर बातमी

आबिटकर बातमी

sakal_logo
By

धामणी, सर्फनालाच्या कामाचे
नियोजन करा ः प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, ता. १० ः राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली खोऱ्यातील धामणी मध्यम प्रकल्प व आजरा तालुक्याच्या हरितक्रांतीसाठी महत्त्वपूर्ण असणारा सर्फनाला मध्यम प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी अधीक्षक अभियंता व संबंधित विभागाला केल्या.
राधानगरी विधानसभा मतदारसंघातील धामणी, सर्फनाला, नागणवाडी, चिकोत्रा, लोंढानाला आदी प्रकल्पांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कोल्हापुरातील सिंचन भवनमध्ये बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
आबिटकर म्हणाले, ‘‘अनेक पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू आहेत व काही प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा पुरविणे गरजेचे आहे, त्यासाठी पुनर्वसन विभागासोबत समन्वय ठेवून योग्य ती कार्यवाही करावी. प्रकल्प पूर्ण होतील; पण साठणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी सर्फनाला, धामणी, चिकोत्रा व नागणवाडी प्रकल्पावर जे जुने केटीवेअर आहेत ते दुरुस्त करणे व जे नवीन मंजूर केटीवेअर आहे, त्यांचे बांधकाम तत्काळ सुरू करा.
लोंढा नाल्यावर जे १७ केटीवेअर प्रस्तावित आहेत, त्यांचीही कामे पूर्ण करा. पाणी आरक्षित करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कॅम्पमध्ये योग्य कागदपत्रांची पूर्तता करून पाणी परवाने द्या.’
अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, अरुणराव जाधव, सागर धुंदरे, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, कार्यकारी अभियंता स्मिता माने, कार्यकारी अभियंता विनया बदामी, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता बागेवाडी उपस्थित होते.