अंक २ भारत जोडो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंक २ भारत जोडो
अंक २ भारत जोडो

अंक २ भारत जोडो

sakal_logo
By

10687
कोल्हापूर : हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या बैठकीप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, आमदार वर्षा गायकवाड, आमदार प्रज्ञा सातव, आमदार प्रा. जयंत आसगावकर आदी.

जिल्ह्यातील १० हजार कार्यकर्ते
भारत जोडो पदयात्रेसाठी रवाना

कोल्हापूर, ता. १० : खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेसाठी जिल्ह्यातील दहा हजार कार्यकर्ते रवाना झाले आहेत. उद्या (ता. ११) पदयात्रा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेवळागाव लक्ष्मी फिलिंग स्टेशन मार्गावर येणार असून, तेथे कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होतील.
पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाबरोबर नियोजन बैठक झाली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार असून, आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांची जेवण व राहण्याची व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले.
आमदार वर्षा गायकवाड, आमदार प्रज्ञा सातव, आमदार प्रा. जयंत आसगावकर, माजी आमदार भाऊराव पाटील, सत्यजित तांबे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संजय दैने, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपअधीक्षक यतीश देशमुख उपस्थित होते.
दरम्यान, कार्यकर्त्यांची व्यवस्थेची आमदार पाटील, आसगावकर यांनी पाहणी केली. आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोकुळ’चे संचालक बयाजी शेळके, सचिन चौगले, माँटी मगदूम, जे. के. पाटील, विनायक सूर्यवंशी, एस. के. शिंदे यांची टीम पंधरा दिवस नियोजनात व्यस्त आहे.

चौकट
पदयात्रा मार्गावर कुस्तीची प्रात्यक्षिके
पदयात्रेत सहभागी होणारे जिल्ह्यातील कार्यकर्ते भगवे फेटे, टी शर्ट परिधान करणार आहेत. लेझीम पथक, ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यांसह मर्दानी खेळ व कुस्तीची प्रात्यक्षिके पदयात्रा मार्गावर दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.