कोवाड-गव्यांचा धुडगूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-गव्यांचा धुडगूस
कोवाड-गव्यांचा धुडगूस

कोवाड-गव्यांचा धुडगूस

sakal_logo
By

लकिकट्टेत गव्यांकडून पिकाचे नुकसान

कोवाड, ता. ११ ः लकिकट्टे (ता. चंदगड) येथे ‘डोंगर’ नावाच्या शेतातील नाचणी व भात पिकात गव्यांनी धुडगूस घालून पिकाचे नुकसान केले आहे. गव्यांच्या त्रासाला शेतकरी वैतागले असून वनविभागाने तत्काळ दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
लाकूरवाडी व काळामवाडीच्या बाजूने लकिकट्टे शिवारात गव्यांचा कळप उतरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसापूर्वी जयवंत खोत व यशवंत देसाई यांच्या नाचणी पिकात धुडगूस घालून गव्यांनी पिकांचे नुकसान केले. संभाजी रेडेकर, जयवंत रेडेकर, आनंदा रेडेकर व संजय रेडेकर यांच्या भात पिकाचेही गव्यांनी नुकसान केले आहे. रात्रीच्यावेळी गवे पिकात उतरत आहेत. गव्यांच्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनीही खबरदारी घेतली असली तरी नुकसानीचे सत्र सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून गव्यांचा त्रास सुरु झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागाने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.