हॉकी विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉकी विजेतेपद
हॉकी विजेतेपद

हॉकी विजेतेपद

sakal_logo
By

61673

हॉकीत जिल्हा पोलिस संघास विजेतेपद
कोल्हापूर, ता. ११ ः फलटण येथे झालेल्या श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जिल्हा पोलिस संघाने मुंबई कस्टम संघावर दोन गोलनी मात करत अजिंक्यपद मिळवले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर पोलिस संघाने महाराष्ट्र क्रीडा मंडळावर ट्रायब्रेकवर विजय संपादन करत अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. कोल्हापूर पोलिस व मुंबई कस्टम यांच्यात अंतिम लढत झाली. त्यामध्ये पोलिस संघाच्या खेळाडूंनी शॉर्ट पासिंग आधारे कस्टम संघावर पकड ठेवली. त्यानंतर एकापाठोपाठ एक चालीचा भडीमार केला. संघाच्या श्रीधर जाधव व पृथ्वीराज साळोखे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून संघास २-० असा विजय मिळवून दिला. संघास पोलिस अधीक्षक बलकवडे, गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, राखीव पोलिस निरीक्षक सत्यवान माशाळकर, क्रीडा प्रमुख इजाज शेख, प्रशिक्षक समीर मुल्ला यांचे मार्गदर्शन मिळाले.

विजता संघातील खेळाडू
असिम महात (कर्णधार), प्रशांत काटकर, मोहन गवळी, संदीप सावंत, विक्रम पाटील, आयुबू पेंढारी, मुकुंद रजपूत, विनोद मनुगडे, सागर कांडगावे, सत्यजित सावंत, पृथ्वीराज साळोखे, श्रीधर जाधव, सिद्धेश्वर सुतार, विनायक गुरव, अमित शिपुरे, हेमंत जाधव, अमर पाटील, मिलिंद मालाई.