वीरपत्नी महाविद्यालयाचा ‘रवळनाथ’शी सांमजस करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीरपत्नी महाविद्यालयाचा ‘रवळनाथ’शी सांमजस करार
वीरपत्नी महाविद्यालयाचा ‘रवळनाथ’शी सांमजस करार

वीरपत्नी महाविद्यालयाचा ‘रवळनाथ’शी सांमजस करार

sakal_logo
By

61701
----------------
वीरपत्नी महाविद्यालयाचा
‘रवळनाथ’शी सांम‍जस्‍य करार
२५ हजारांची देणगी : विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : तिटवे (ता. राधानगरी) येथील वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय व श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीमध्ये सांम‍जस्‍य करार केला. यानिमित्त महाविद्यालयातील शिक्षक प्रशिक्षणासाठी रवळनाथतर्फे २५ हजारांची देणगी दिली.
वीरपत्नी महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील अध्यक्षस्थानी होत्या. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर, मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. दत्ता पाटील, प्रा. रामकुमार सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले म्हणाले, ‘‘रवळनाथ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा घेतल्या जातील. त्याचा गुणवत्ता वाढीसाठी उपयोग होईल. तिटवेसारख्या खेड्यात मुलींसाठी सुरक्षित शैक्षणिक संकूल उभारण्याची शहीद परिवाराची कामगिरी कौतुकास्पद आहे.
डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, ‘‘रवळनाथची घोडदौड, कार्यपद्धती, सामजिक व शैक्षणिक योगदान अमूल्य आहे. रवळनाथच्या सहकार्यातून आपले महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात वेगळा मानदंड निर्माण करेल. महाविद्यालयात पारंपारिक शिक्षणाऐवजी व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर दिला आहे.’’ प्राचार्य यशवंत पालकर यांनी प्रास्ताविक केले. ऐश्‍वर्या कवडे यांनी सूत्रसंचालन केले. विश्‍वस्त अनिल पाटील, सचिव दिलीप देसाई, विभागप्रमुख आदी उपस्थित होते. प्रा. दिग्विजय कुंभार यांनी आभार मानले.