ओंकारमध्ये टॅली विषयावर व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओंकारमध्ये टॅली विषयावर व्याख्यान
ओंकारमध्ये टॅली विषयावर व्याख्यान

ओंकारमध्ये टॅली विषयावर व्याख्यान

sakal_logo
By

ओंकारमध्ये टॅली विषयावर व्याख्यान
गडहिग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे कौशल्यावर आधारित टॅली या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. पायोनिअर संगणक संस्थेचे संचालक शिवाजी चव्हाण यांनी टॅली संकल्पना, व्यावहारिक महत्त्‍व, स्वरुप वस्तू -सेवा, कर व टॅलीतील करिअर अशा विविध अंगांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. प्रा. मेघा बाळेशगोळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शुभांगी ठोंबरे यांनी आभार मानले. वाणिज्य विभागाचे प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
------------------------------------------------
61702
हॉकी खेळाडूंचा घाळीमध्ये सत्कार
गडहिंग्लज : शिवाजी विद्यापीठाच्या आंतर विभागीय महिला हॉकी स्पर्धेत घाळी महाविद्यालयाने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. संघातील खेळाडूंचा विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांच्याहस्ते सत्कार झाला. कोल्हापूर, सांगली व सातारा विभागातून संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे संयोजन डॉ. घाळी महाविद्यालयाकडे होते. संघात प्रीती माने, स्वाती फुटाणे, शुकवेली हेशागोळ, अमृता जाधव, विद्या नगरे, मोनिका आरबोळे, साक्षी सूर्यवंशी, सानिका पोवार, माधुरी भोसले, प्राजक्ता गायकवाड, सरिता मुरगी, कृष्णा माने आदी खेळाडूंचा गौरव केला. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, प्रा. ओंकार खतकल्ले आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------

जनता गृहतारण संस्थेत सत्कार
गडहिंग्लज : जनता गृहतारण संस्थेच्या येथील शाखेतर्फे गोडसाखरच्या नूतन संचालकांचा सत्कार केला. सतीश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, दिग्विज कुराडे, अशोक मेंडुले, शिवराज पाटील, कविता पाटील यांचा सत्कार संस्थाध्यक्ष मारुती मोरे, शाखाध्यक्ष प्रकाश पोवार, उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण चौगुले, संचालक पंडीत पाटील, डॉ. तुकाराम पोवार, आप्पा शिवणे, उषा पोवार यांच्या हस्ते हा सत्कार झाला. प्रकाश पोवार यांनी स्वागत केले. मारुती मोरे यांनी प्रास्ताविक केले. पंडीत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बाळकृष्ण चौगुले यांनी आभार मानले.
----------------------------------------------------

घाळी महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश
गडहिंग्लज : शिवाजी विद्यापीठातंर्गत झालेल्या विभागीय व आंतरविभागीय मैदानी स्पर्धेत येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या मुलींच्या रीले संघाने अनुक्रमे १०० व ४०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक पटकावले. जत येथे झालेल्या आंतरविभागीय स्पर्धेतही तृतीय क्रमांक मिळवला. यामध्ये रविना होडगे, सरिता मुरगी, स्वाती कांबळे, शहाजादबी किल्लेदार या खेळाडूंचा समावेश होता. सोनाली रायकर हिने शंभर मीटर हर्डल्समध्ये द्वितीय व तनुजा पाटीलने ट्रीपल जंपमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्वांचा संस्थाध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांच्या हस्ते सत्कार झाला. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, प्रा. ओंकार खतकल्ले आदी उपस्थित होते.