पोषण आहार संघनेतर्फे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोषण आहार संघनेतर्फे कार्यक्रम
पोषण आहार संघनेतर्फे कार्यक्रम

पोषण आहार संघनेतर्फे कार्यक्रम

sakal_logo
By

१४ नोव्हेंबर हा पोषण हक्क, शिक्षण
हक्क दिवस म्हणून पाळणार ः पाटील

कोल्हापूर, ता. ११ : जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटना बालकांच्या भुकेच्या आणि शिक्षणाच्या प्रश्रावर बाल दिन मागणी दिवस म्हणून १४ नोव्हेंबर पाळणार आहे, अशी माहिती राज्य संघटना फेडरेशनचे अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील यांनी दिली.
प्राचार्य पाटील म्हणाले, ‘‘किमान पोटाला मिळते म्हणून गरिबांची मुले शाळेत घातली जातात. यामुळे पोषण आणि शिक्षण दोन्हींचे संरक्षण होत असे. आता २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद केल्या जाणार आहेत. याला विरोध म्हणून संघटनेतर्फे बाल दिन पोषण आणि शिक्षण हक्क दिवस म्हणून पाळला जाणार आहे. सर्वात कमी पगार घेणारा म्हणजे दरमहा पंधराशे रुपये पगार घेणारा कामगार महाराष्ट्रात आहे. तामिळनाडू, केरळ, हरियाणा येथे आपल्यापेक्षा अधिक चांगला पगार आहे. त्याप्रमाणे पगार वाढ करून किमान वेतन द्यावे, अशी मागणी आहे.
याकरिता १४ नोव्हेंबरला आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे. त्यापुढे १० डिसेंबरला मानवी हक्क दिवस, ११ डिसेंबरला मागणी दिवस, सहा जानेवारी २०२३ ला आमदार, खासदारांच्या घरावर मोर्चे काढण्यात येतील.’’
पत्रकार परिषदेला जिल्हा सचिव निवेदिता वासमकर, उपाध्यक्ष तानाजी कुंभार उपस्थित होते.
...