संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

61805

वाचा, वेचा आणि साठवा
डॉ. शिंदे ः स्व. डी. बी. पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेच्या न्यू कॉलेज व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील व्याख्यानमाला व सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आज उद्‌घाटन झाले. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. ते म्हणाले, ‘‘जगातील प्रत्येक देशाचा इतिहास असे सांगतो की प्रत्येक क्रांतीमागे, लढ्यामागे, परिवर्तनापाठीमागे वक्ताच होता. आदर्श वक्ता होण्यासाठी प्रथम वाचा, वाचनातून महत्त्‍वाचे वेचा, वेचलेले साठवा आणि साठवलेले नेहमी आचरणात आणा.’’ वैभव नायकवडी यांनी मार्गदर्शन केले. य संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजानिस वाय. एस. चव्हाण, उपप्राचार्य प्रा. एस. एन. इनामदार, राजेंद्र पाटील, जयंत पाटील, सविता पाटील, सुमन पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. विनय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनीषा नायकवडी व प्रा. उमा गायकवाड यांनी केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी आभार मानले.
-------------
कमला कॉलेजमध्ये घोषवाक्य स्पर्धा
कोल्हापूर ः ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त घोषवाक्य स्पर्धा झाली. यामध्ये मुलींमध्ये शिक्षणाचे महत्त्‍व, स्त्री-भ्रूणहत्या, पर्यावरण, आरोग्य व वाढती लोकसंख्या या विषयांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर होत्या. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. उदय आठवले, प्रा. हेमलता मिणचेकर, प्रा. नम्रता निकम, उदयकुमार इनामदार उपस्थित होते. डॉ. दिनकर कबीर यांनी प्रास्ताविक केले.