आज आवश्‍यक बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज आवश्‍यक बातम्या
आज आवश्‍यक बातम्या

आज आवश्‍यक बातम्या

sakal_logo
By

‘एमएसएमई’ यात्रेचे आज आगमन
कोल्हापूर : ‘आजादी का अमृतमहोत्सव’निमित्त इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस्‌ ऑफ इंडियातर्फे भारतात आयसीएआय एमएसएमई यात्रा आणि ‘सेतू’चे आयोजन केले आहे. या यात्रेचे आगमन उद्या (ता. १२) येथे होत आहे. दिवसभर ही बस कोल्हापूरमधील विविध ठिकाणी जाऊन एमएसएमईसंबंधी माहिती, सल्ला आणि मार्गदर्शन करणार आहे. यात्रेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होणार असून, यात्रेचे स्वागत खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते होत आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन कोल्हापूर शाखेकडून केले आहे. देशातील एमएसएमई व्यावसायिकांना एकत्र जोडणेसाठी आणि त्यांना भारत सरकारतर्फे मिळणाऱ्या विविध योजनांबद्दल माहिती मिळावी, म्हणून भारतातील ७५ शहरांमध्ये ही बस यात्रा काढण्यात येत आहे.
...
अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचे आयोजन
कोल्हापूर : भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्लीकडून (एन. सी. यू. आय) १४ ते २० नोव्हेंबर कालावधीत देशात अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचे आयोजन केले आहे. हा ६९ वा सप्ताह होत असून, या वर्षाच्या सहकारी सप्ताहाची मुख्य संकल्पना ‘भारत @75 : सहकारी संस्थांची वाढ आणि भविष्यकालीन वाटचाल’ ही आहे, अशी माहिती जिल्हा सहकार विकास अधिकारी एस. टी. जाधव, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, प्राचार्य सुनील मालप यांनी पत्रकाद्वारे दिली. सहकारी सप्ताहाचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभाविपणे साजरा करावा, असे आवाहन केले आहे. राज्य सहकारी संघ मर्या पुणे, सहकार खात्यामार्फत राज्यात सहकार सप्ताह कार्यक्रम होतील.