ज्वेलरी शो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्वेलरी शो
ज्वेलरी शो

ज्वेलरी शो

sakal_logo
By

61815

इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी
प्रदर्शनाचा कोल्हापुरात ‘रोड शो’

कोल्हापूर ता. ११ ः जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) यांच्यातर्फे ५ ते ९ जानेवारी या कालावधीत इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो ‘सिग्नेचर २०२३’ हे प्रदर्शन मुंबई येथे भरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यामानाने दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग येथे या प्रदर्शनाचा ‘रोड शो’ झाला. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल, जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे हेड ऑफ मेम्बरशिप आणि MSME ऑल इंडिया हेड मिथिलेश पांडे, असिस्टंट डायरेक्टर मिस नाहीद सुंके, असिस्टंट मॅनेजर अनु कोडगुले, एक्झिकेटिव्ह शीतल केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे सचिव तेजस धडाम, संचालक कुलदीप गायकवाड, किरण गांधी, अशोक ओसवाल, ललित ओसवाल, सिद्धार्थ परमार, ललित ओसवाल, संजय रांगोळे, विजयकुमार भोसले, भैरू ओसवाल, शिवाजी पाटील, शीतल पोतदार यावेळी उपस्थित होते.
पांडे यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. हावळ यांनी सूत्रसंचालन केले. ओसवाल यांनी आभार मानले.