मंगळवारी महामोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवारी महामोर्चा
मंगळवारी महामोर्चा

मंगळवारी महामोर्चा

sakal_logo
By

गायरान अतिक्रमण धारकांचा
मंगळवारी सर्वपक्षीय महामोर्चा
दसरा चौकातून सकाळी दहाला मोर्चाला प्रारंभ

कोल्हापूर, ता. ११ ः जिल्ह्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाविरोधात मंगळवारी (ता. १५) सकाळी दहा वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढणार असल्याची माहिती निमंत्रक माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमणे काढून टाकण्याचा कालबद्ध आराखडा निश्चित करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होणार असली, तरी त्यामुळे जिल्ह्यातील सव्वा लाखाहून अधिक अतिक्रमणे निघणार असून, सुमारे सहा लाख नागरिक बेघर होणार आहेत. गेल्या काही वर्षांत वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत राहण्यासाठी गावानजीक स्वमालकीची जमीन नसल्यामुळे ग्रामस्थांनी शासकीय जमिनीमध्ये घरे बांधली आहेत. ही घरे हटविल्यास नागरिकांचा हक्काचा निवारा नाहीसा होणार आहे. त्यामुळे शासनाने अतिक्रमण कारवाई थांबविण्याबाबत उच्च न्यायालयात तत्काळ याचिका दाखल करावी आणि अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा होणार आहे. जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांनी मोठ्या संख्येने त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.