निगवे खालसा मंदिराला ब वर्ग दर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगवे खालसा मंदिराला ब वर्ग दर्जा
निगवे खालसा मंदिराला ब वर्ग दर्जा

निगवे खालसा मंदिराला ब वर्ग दर्जा

sakal_logo
By

निगवे खालसा येथील
नृसिंह सरस्वती मंदिराला ''ब'' वर्ग दर्जा
आमदार ऋतुराज पाटील ः बालिंगा महादेव मंदिराचाही समावेश
कोल्हापूर, ता. ११ ः करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती मंदिर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ''ब'' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुराव्याला यश आल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १९८० च्या दरम्यान स्थापन झालेल्या या मंदिरात नृसिंह सरस्वती जयंती उत्साहात साजरी होते. त्यानिमित्ताने सात दिवस पारायण व त्यानंतर महाप्रसाद होतो. या उत्सवाला सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नृसिंह सरस्वती दत्तभक्त उपस्थित असतात. मंदिर ट्रस्टकडून वाचन चळवळ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासह विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. सभागृहासाठी निधी देण्याचे जाहीर केले असून मंदिराला ‘ब'' वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य निकष समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या समितीने जिल्ह्यातील बारा मंदिर स्थळांना ग्रामीण ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा जाहीर केला असून बालिंगा येथील महादेव मंदिराचाही समावेश असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.