पार्किंगबाबत कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्किंगबाबत कार्यशाळा
पार्किंगबाबत कार्यशाळा

पार्किंगबाबत कार्यशाळा

sakal_logo
By

यांत्रिकी कार पार्किंगसाठी
मदत करण्याचे आश्‍वासन
कोल्हापूर, ता. ११ ः कोल्हापूरसारख्या शहरातील चारचाकींच्या पार्किंग समस्येवर मार्ग काढण्यासाठी यांत्रिकी कार पार्किंग गरजेचे आहे. त्यासाठी मदत करण्याचे आश्वासन वोअर कंपनीने आज दिले. तसेच, कोल्हापूरच्या विकासासाठी पार्किंग सोल्यूशन्सचे कौशल्य स्वेच्छेने प्रदान करण्याचे आश्‍वासन दिले.
कार पार्किंग व्यवस्थापनाच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांची माहिती देण्यासाठी आज आर्किटेक्ट असोसिएशनबरोबर कंपनीची बैठक झाली. त्यात विविध संकल्पनांवर चर्चा झाली. वाहनांसाठी पार्किंगची जागा शोधण्यातून वाहनांची विनाकारण गर्दी होऊन सल्फर डायऑक्साईड, सूक्ष्म धूलिकण, कार्बन मोनाक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन अशा वायूंचे उत्सर्जन होते आणि प्रदूषणाची पातळी वाढते. त्यामुळे सार्वजनिक पार्किंग समस्या सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन या कंपनीने दिले. तसेच, यांत्रिक पार्किंगसह त्यांच्या पार्किंग लेआउटचे नियोजन करण्यात मदत केली जाईल, असे सांगितले.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश व्यास, उपाध्यक्ष संदीप कुलकर्णी, विकास पाठक, सरव्यवस्थापक मिलिंद देशपांडे, सौरभ महाजन, आर्किटेक्ट ॲण्ड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे आदी उपस्थित होते.