इचल ः दिंडी स्पर्धा जिल्ह्यासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः दिंडी स्पर्धा जिल्ह्यासाठी
इचल ः दिंडी स्पर्धा जिल्ह्यासाठी

इचल ः दिंडी स्पर्धा जिल्ह्यासाठी

sakal_logo
By

ich११७.jpg
61824
इचलकरंजी ः दिंडी सोहळा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देताना आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे आदी.

दिंडी सोहळा स्पर्धेत
हुपरी, उत्तूरला विजेतेपद

इचलकरंजी, ता. ११ ः येथे प्रथमच आयोजीत केलेल्या दिंडी सोहळा स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर जिल्हास्तर गटात हुपरीच्या संत बाळूमामा दिंडी व उत्तूरच्या विठ्ठ्ल - रुक्मिणी दिंडीस विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. बक्षीस वितरण घोरपडे नाट्यगृहात आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते झाले.
येथील प्रख्यात काळा मारुती मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम घेतला. भक्त मंडळातर्फे झालेल्या या स्पर्धेत जिल्हास्तरावर येवतीच्या श्री पांडुरंग भजनी मंडळ आणि म्हाळुंगेच्या विठ्ठुमाऊली पायी दिंडीस विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला. अब्दुललाटच्या संत रोहिदास सोंगी भजनी मंडळ आणि कापशीच्या विठ्ठल-रुक्मिणी पायी दिंडीस विभागून तृतीय क्रमांक दिला. गोरंबेचे माऊली हरिपाठ भजनी मंडळ चतुर्थ, तळगाव (ता. राधानगरी) च्या विठ्ठल माऊली भजनी मंडळास पाचवा, भुदरगड दिंडी सोहळा मौनी महाराज दिंडीस सहावा आणि शिरोळच्या आम्ही भजनी मंडळास सातव्या क्रमांकाचे बक्षीस दिले. इचलकरंजी शहर गटातील सहभागी सर्वच दिंड्यांना सर्व बक्षिसे विभागून देण्यात आली. यावेळी राहूल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील, सदाशिव उपासे महाराज, प्रकाश मोरे, दत्तात्रय मेटे, सागर मुसळे, गोविंदलाल बजाज, शामराव शिंदे, चंद्रकांत पाटील, एम.के. कांबळे, सर्जेराव पाटील, राजेंद्र बचाटे, राहुल घाट उपस्थीत होते. तत्पूर्वी, शहरातील मुख्य मार्गावरुन दिंडी सोहळा निघाला. त्यामुळे वस्त्रनगरीत विठ्ठलमय झाली होती.