अर्बन बॅंकेसाठी उद्या मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बॅंकेसाठी उद्या मतदान
अर्बन बॅंकेसाठी उद्या मतदान

अर्बन बॅंकेसाठी उद्या मतदान

sakal_logo
By

अर्बन बॅंकेसाठी उद्या मतदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : दि कोल्हापूर अर्बन बॅंकेसाठी उद्या (ता. १३) मतदान होत आहे. बॅंकेचे २८ हजार ९८३ व्यक्ती व २३१ संस्था सभासद बॅंकेच्या १५ संचालकांसाठी ५४ मतदान केंद्रांवर मतदान करतील. यात कोल्हापूर येथे पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कळंबा, गोकुळ शिरगाव, आंबेवाडी, रत्नागिरी व पुणे येथे मतदान होईल. तर, मंगळवारी (ता. १५) सकाळी आठपासून कसबा बावडा रमण मळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात मतमोजणी होईल. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी व विरोधकांनी आपापला प्रचार जोरदार सुरू ठेवला आहे. यात कोणाला यश मिळणार आणि कोणाला पराभव पत्करावा लागेल, याबाबत शहरात कमालीची उत्सुकता आहे.