गव्याची भिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गव्याची भिती
गव्याची भिती

गव्याची भिती

sakal_logo
By

गव्यांची भीती, लोकांचा संभ्रम अन वनविभागाची सर्तकता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः गव्‍यांचा कळप आल्याची माहिती मिळाली आणि तरुणाईच्या गाड्यांच्या चकरा रमणमळ्याच्या दिशेने होऊ लागल्या. समाजमाध्यमावरील कोणी गव्याचे फोटो टाकले, मात्र अन्‍यत्र ठिकाणचे होते. काही फोटोत एक गवा दिसत होता, तर काही फोटोत दोन गवे दिसले तर बुधवारचा व्‍हिडिओ वनविभागात फिरत होता. रमणमळा ते वडणगेच्या वाटेवर दिसेल ते लोक एकमेकांना विचारात होते... गवा कुठं आलाय, तेव्हा उत्तर येत होते, ‘सकाळीच येऊन गेला’. हीच माहिती वनविभागाकडे पोहचत होती. कोणी उत्सुकतेने रमणमळ्याकडे येत होते तर कोणी लहान मुलांना ‘घरा बाहेर जावू नका’ असे सांगत दरवाजे लावून घेत होते. वनपथकाने मात्र गवा वस्तीपासून जवळपास अर्धा किलोमीटरवर रोखण्याचे नियोजन केले. या साऱ्या घटनाक्रमात लोकांच्या मनात भीती, वनविभागाची धावपळ, तरुणांची हौस व उत्सुकता शिगेला पोहचली. अशा घालमेलीच्या स्थितीत गवा शोध मोहीम रमणमळा, कसबा बावडा, वडणगे परिसराची चिंता वाढवून गेली खरी पण गव्याच्या पाऊलखुणा दिसल्या तर कोणाला दोन गवे दिसले.