आजरा ः पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त

आजरा ः पोलीस वृत्त

sakal_logo
By

उत्तूरजवळ हालेवाडी फाट्यावर गोळीबार?
आजऱ्यात खळबळ; पोलिसांकडून युवकांची चौकशी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ११ : हालेवाडी (ता. आजरा) फाट्याजवळ हुपरी-रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील युवकांनी हुल्लडबाजी करीत हवेत गोळीबार केल्याची चर्चा आज आजरा तालुक्यात रंगली. याबाबात पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती; पण त्याला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, फाट्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी गोळीबार झाल्याचे सांगितले. रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती, हुपरी रेंदाळ येथील संशयित आठ जण चार चाकीतून गोव्याकडे निघाले होते. हालेवाडी फाट्यावर हे युवक हुल्लडबाजी करत असल्याचे जवळच असलेल्या संकल्प हॉटेलचे मालक संजय येझरे यांच्या निदर्शनास आले. येझरे आपल्या सहकाऱ्यांसह फाट्याकडे जात असताना युवकांनी गोळीबार केल्याचा आवाज त्यांनी ऐकल्याचे सांगितले. ते युवक गाडी वेगाने येझरे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करीत आजऱ्याच्या दिशेने निघून गेले. येझरे यांनी याबाबतची माहिती ११२ वर आजरा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. आजरा पोलिसांनी या युवकांना येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू असता त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस चौकशीसाठी गेले आहेत. दरम्यान, गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले आजरा पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव अधिक तपास करीत आहेत.